तापमान

तापमानाचे असमान वितरण

views

3:39
पृथ्वीच्या मध्यातून जी आडवी रेषा गेली आहे, ती ०० अक्षवृत्ताची आहे. त्यालाच विषुववृत्त म्हणतात. तसेच पृथ्वीच्या उत्तरेकडील टोकास उत्तरध्रुव आणि दक्षिणेकडील टोकास दक्षिण ध्रुव म्हणतात. उत्तर ध्रुव हे विषुववृत्तापासून ६६०३०’मिनिटे उत्तरेस असते तर दक्षिण ध्रुव विषुववृत्तापासून ६६०३०’मिनिटे दक्षिणेस असते. पृथ्वीवर येणारी सूर्यकिरणे सरळ रेषेत व एकमेकांना समांतर असतात. परंतु, पृथ्वीचा आकार हा गोल आहे. आणि या गोल आकारामुळेच पृथ्वीवर पडणारी ही सूर्याची किरणे वेगवेगळ्या ठिकाणी कमी - जास्त जागा व्यापतात. त्यामुळेच पृथ्वीवर सर्व ठिकाणी सूर्याची उष्णता समान नसून ती असमान असते. आणि म्हणूनच विषुववृत्तापासून उत्तर व दक्षिण ध्रुवाकडील तापमानात फरक आढळतो. या तापमानाच्या वितरणानुसार पृथ्वीचे विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत तीन पट्ट्यात विभाजन होते. कर्कवृत्तापसून मकरवृत्तापर्यंत – उष्ण कटिबंध, कर्क व मकर वृत्तापासून उत्तरेला व दक्षिणेला ६६०३०’मिनिटांपर्यंत समशीतोष्ण कटिबंध तर ६६०३०’मिनिटांपासून उत्तर व दक्षिण ध्रुवापर्यंतच्या भागाचे शीत कटिबंधात विभाजन झाले आहे. ही झाली अक्षवृते, ज्यांच्या स्थानामुळे पृथ्वीवरील तापमान असमान असते. या घटकाशिवाय इतर अनेक घटक आहेत जे तापमानावर परिणाम करत असतात .