नैसर्गिक संसाधने Go Back नैसर्गिक संसाधने हवा views 3:12 ज्या नैसर्गिक घटकांचा मानव वापर करतो त्यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. हा तक्ता पहा. हवा, मृदा, पाणी, वनस्पती, प्राणी, खनिजे आणि जमीन ही नैसर्गिक संसाधने आहेत. जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी या संसाधनांची गरज असते. निसर्गात उपलब्ध असलेल्या या पदार्थांचा उपयोग सजीव जगण्यासाठी करतात. नैसर्गिक साधनसंपत्तीचे दोन प्रकार असतात. पहिला म्हणजे पुनःपुन्हा उत्पन्न होऊ शकणारी साधनसंपत्ती उदा., वनस्पती, पाणी, वायू इत्यादी. या साधनसंपत्तीला अक्षय म्हणता येईल कारण काळजीपूर्वक वापरल्यास ती कायमची राहू शकते. म्हणजे वनांची योग्य ती काळजी घेतल्यास मूळ साधनसंपत्तीत घट न होता वनातील उत्पादने उदा. लाकूड, औषधी द्रव्ये, टॅनीन, डिंक, मध इ. वर्षानुवर्षे उत्पन्न होत राहतील. सूर्यापासून मिळणारी ऊर्जाही अशीच अक्षय आहे; आणि दुसरा प्रकार म्हणजे पुन्हा उत्पन्न न होऊ शकणारी साधनसंपत्ती उदा., खनिजे. पुन्हा उत्पन्न न होणारी साधनसंपत्ती ही वापराने संपून जाते. जसे , दगडी कोळसा, खनिज तेल इत्यादी. प्रस्तावना - भौगोलिक स्पष्टीकरण नैसर्गिक संसाधने हवा नैसर्गिक संसाधने मृदा नैसर्गिक संसाधने वनस्पती नैसर्गिक संसाधने प्राणी नैसर्गिक संसाधने– खनिजे नैसर्गिक संसाधने जमीन