नैसर्गिक संसाधने

नैसर्गिक संसाधने वनस्पती

views

3:48
तुमच्या आजूबाजूला तुम्ही विविध प्रकारच्या वनस्पती पाहिल्या असतील. स्थूलमानाने या वनस्पतींचे गवत, झुडूप, झाड आणि वृक्ष असे वर्गीकरण केले जाते. फार वर्षांपूर्वी म्हणजेच अश्मयुगीन काळात आदिमानवाला शेतीचे ज्ञान नव्हते. परंतु नंतरच्या काळात जसजसे एक-एक शोध लागत गेले, तसतसे मानवाने तृणांची लागवड करून पहिल्यांदा शेतीद्वारे धान्य मिळवण्याचा प्रयोग केला. परिणामी त्याला अन्नासाठी करावी लागणारी वणवण टाळता आली.त्यामुळे मानवाच्या आयुष्याला स्थैर्य आले. तो एके ठिकाणीच वस्ती करून राहू लागला. यामुळेच सिंधू, नाईल, युफ्रेटिस व होयांगहो या नद्यांच्या खोऱ्यात मानवी वस्ती वाढू लागली. पृथ्वीच्या जवळ – जवळ १४% भाग जंगलांनी व्यापलेला आहे. जंगलांमधील वनस्पतींपासून मानवाला लाकूड, औषधे, डिंक, रबर, फळे, फुले, मसाल्याचे पदार्थ, बांबू, वेत, अशा विविध गोष्टींचा लाभ होतो. नारळाच्या झाडाला ‘कल्पवृक्ष’ म्हणतात. कारण या झाडापासून अनेक वस्तू बनवता येतात. हिराचे झाडू, नारळाचे तेल, सुके खोबरे, शोभेच्या वस्तू. नारळाच्या झावळ्यांचे झाप घर शाकारायला वापरतात. तर स्वयंपाकामध्येही नारळाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. यापासून नारळी, भात, नारळाच्या वड्या, उकडीचे मोदक बनवले जातात.