नैसर्गिक संसाधने Go Back नैसर्गिक संसाधने मृदा views 4:9 नैसर्गिक संसाधने यामध्ये मृदा याविषयी पाहू. प्राचीन काळापासूनच मानवाने शेती विकसित केली आहे. नदीच्या खोऱ्यातील सुपीक जमिनीत आदिमानवाने अन्न धान्याची लागवड करून उत्पादन काढले. कालांतराने शेती करण्याच्या तंत्रात बदल होत गेला. आता आधुनिक तंत्र वापरून शेतीतून प्रचंड प्रमाणात धान्य निर्मिती केली जाते. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, कापूस, ऊस ह्याबरोबरच भाजीपाला, फळे, औषधी वनस्पतींची लागवड करून उत्पादन काढता येते. हा शेतकरी बघा. आपल्या बैलांच्या मदतीने तो जमीन नांगरतो आहे. शेतकरी जमिनीवरील मृदेचा थर नांगरून जमीन मोकळी बनवतो. आणि नंतर या कसलेल्या जमिनीतून भरघोस पिके घेतो. या पिकांच्या उत्पन्नातून तो स्वतःची व इतरांची अन्नाची गरज भागवतो. हे सर्व करण्यासाठी तो जमिनीवर निसर्गतः उपलब्ध असलेली मृदा संसाधन म्हणून वापरत असतो. म्हणूनच मानवाच्या शेती व्यवसायामध्ये मृदा हे एक महत्वाचे संसाधन आहे. मृदा निर्मिती ही प्रामुख्याने मूळ खडक, हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार आणि कालावधी या घटकांवर अवलंबून असते. त्यापैकी हवामान व खडकांच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या प्रदेशात निरनिराळ्या प्रकारची मृदा तयार होते. प्रस्तावना - भौगोलिक स्पष्टीकरण नैसर्गिक संसाधने हवा नैसर्गिक संसाधने मृदा नैसर्गिक संसाधने वनस्पती नैसर्गिक संसाधने प्राणी नैसर्गिक संसाधने– खनिजे नैसर्गिक संसाधने जमीन