रोमन संख्याचिन्हे Go Back रोमन संख्यांचे नियम १ ते ४ views 5:00 रोमन संख्यांचे नियम : नियम क्र. १- I व X यापैकी एखादे चिन्ह दोनदा किंवा तीनदा एकापुढे एक लिहल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळतात. उदा. II = 1+1 = 2 XI = 10+1 = 11 III = 1+1+1 = 3 XX = 10+10 = 20 नियम क्र.2 - I आणि X ही चिन्हे एकापुढे एक जास्तीत जास्त तीन वेळा लिहतात. पण V हे चिन्ह एकापुढे एक लिहीत नाहीत. उदा. :- I+I+I = 3 X+X+X+ = 10+10+10 = 30 नियम क्र.३ – I किंवा V यांपैकी एखादे चिन्ह मोठया संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहले तर त्याची किंमत डावीकडील संख्येत मिळवली जाते. म्हणजेच I किंवा V या संख्येच्या उजवीकडे संख्या लिहिली तर मूळ संख्येत ती संख्या मिळवतात म्हणजे त्याची बेरीज करतात. उदा. VI = 5+1 = 6 (V म्हणजे 5 या संख्येच्या उजवीकडे I म्हणजे 1 लिहले असता 5+1 = 6 लिहतात.) 2) VII = 5+1+1 = 7 3) VIII = 5+3 = 8 4) XIII = 10+3 =13 5) XV = 10+5 = 15 6) XVI = 10+6 = 16 7) XII 10+2 = 12 नियम क्र.४ - I हे चिन्ह V किंवा X या चिन्हांच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत V किंवा X च्या किमतीतून (मोठ्या संख्येतून) वजा केली जाते. मात्र I हे चिन्ह V किंवा X च्या डावीकडे एकापेक्षा जास्त वेळा लिहित नाहीत. उदा. IV = 5-1 = 4 1) V च्या अगोदर I लिहिले म्हणजे 5 मधून 1 संख्या वजा केली असता उत्तर 4 येते. म्हणून 4 लिहण्यासाठी आपण IV या अक्षरांचा वापर करतो. IX = 10 – 1 = 9 प्रस्तावना रोमन संख्यांचे नियम १ ते ४ 1 ते 100 अंकांचे रोमन चिन्हांत लेखन रोमन संख्यांचा सराव