दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये Go Back पांड्य घराणे views 2:45 पांड्य घराणे: प्राचीन दक्षिण भारतातील दुसरे राज्य म्हणजे पांड्य होय. पांड्य घराणे दक्षिण हिंदुस्थानातील एक प्राचीन घराणे होते. पांड्यांची राजधानी मदुराई ही होती. हे राज्य आजच्या तामिळनाडू मध्ये विस्तारले होते. पांड्य राज्य हे गौतम बुद्धांच्या कालखंडातही अस्तित्वात होते. इतर भारतीय राजांप्रमाणे पांड्यांनीही विद्या व कला यांना आश्रय दिला होता. राज्यकारभारात पांड्यांनी एक नवीन सुधारणा केली. प्रत्येक राजा आपणाबरोबर आपल्या राजकुमारांनाही राज्यशासनाचा अधिकार देई. पांड्य राजांनी काही गुहा खोदविल्या. पण त्यांचा भर वास्तुशिल्पांवर अधिक होता. उत्तरकालीन पांड्य शिल्पांपैकी मीनाक्षीसुंदरम् मंदिरातील काही पांड्य शिल्पेही प्रेक्षणीय आहेत. या काळात मंदिराच्या भोवती संरक्षणासाठी तट उभारले होते. त्यातील श्रीरंगमचे मंदिर फारच मोठे असून त्यात एकात एक असे सात प्रकार आहेत.चोळ घराणे: प्राचीन भारतातील एक महत्त्वाची राजसत्ता म्हणून चोळ राजसत्ता ओळखली जाते. इ. स.च्या प्रारंभीच्या सुमारास करिकाल चोल हा अत्यंत प्रसिद्ध आणि थोर राजा होऊन गेला. त्याने पांड्य व चेर या दक्षिणेकडील राजांचा पराभव केला. अशोकाच्या स्तंभालेखामध्ये चोळ राज्याविषयी माहिती आढळते. तमिळ साहित्याच्या इतिहासात चोळ शासन व्यवस्थेला स्वर्णयुग म्हटले आहे. प्रस्तावना पांड्य घराणे सातवाहन राजघराणे वाकाटक राजघराणे पल्लव राजघराणे