दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये Go Back सातवाहन राजघराणे views 5:30 सातवाहन राजघराणे: सातवाहन राजघराणे हे दक्षिण भारतातील प्राचीन घराण्यांपैकी एक महत्त्वाचे शक्तिशाली राज्य होते. मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर म्हणजे अशोक सम्राटाच्या मृत्यूनंतर सातवाहनांनी स्वतःला स्वतंत्र राज्य म्हणून जाहीर केले. सातवाहन राज्याची स्थापना मौर्य सत्तेच्या पराभवापूर्वी सुमारे पन्नास वर्षेपूर्वी झाली होती. सातवाहनाचे राज्य हे दक्षिण भारतातील मोठे राज्य होते. मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारतात अनेक छोट्या-छोट्या राज्यांची थोड्या-थोड्या अंतराने निर्मिती झाली. तशीच स्थिती दक्षिण भारतातही झाली होती. त्याचाच परिणाम म्हणून दक्षिण भारतात अतूट, अविभाज्य व अखंड असे सातवाहन राज्य उदयास आले. प्रतिष्ठान म्हणजेच आजच्या महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण हे ठिकाण सातवाहनाचे राजधानीचे ठिकाण होते. राजा सिमुक हा सातवाहन साम्राज्याचा संस्थापक होता. त्याने जवळजवळ २३ वर्षे राज्य केले. सिमुकने आपल्या कारकिर्दीत अनेक जैन व बौद्ध मंदिराची निर्मिती केली. परंतु नंतरच्या काळात तो लोकांवर जुलूम करू लागला. म्हणून त्याची राजा या पदावरून हकालपट्टी करून त्याची हत्या करण्यात आली. त्याच्यानंतर कान्हा (कृष्ण) शक्तीश्री, सातकर्णी द्वितीय (दुसरा), हाल व गौतमीपुत्र सातकर्णी या राज्यांनी राज्य केले. या व्यक्तींची माहिती महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याजवळील नाणे घाटातील ज्या लेण्या आहेत. त्यामध्ये असलेल्या कोरीव लेखांमध्ये उपलब्ध होते. प्रस्तावना पांड्य घराणे सातवाहन राजघराणे वाकाटक राजघराणे पल्लव राजघराणे