शेकडेवारी

शेकडेवारी ची माहिती अपूर्णांकाच्या रूपात

views

3:33
आता आपण शेकडेवारी ची माहिती अपूर्णांकाच्या रुपात कशी लिहितात ते पाहू. 1) 50 % टक्के भाग म्हणजे एकूण 100 भागांपैकी 50 भाग हे तुम्हाला माहीतच आहे. पण आता याच संख्येला अपूर्णांकांच्या स्वरुपात लिहायचे असल्यास ते 50/100 असे लिहितात. तसेच 25% भाग म्हणजे एकूण 100 भागांपैकी 25 भाग. ते अपूर्णांकांच्या रुपात 25/100 असे लिहितात. 75% भाग म्हणजे एकूण 100 भागांपैकी 75 भाग. हे अपूर्णांकात 75/100 असे लिहितात. मग मला सांगा 35% हे अपूर्णांकाच्या स्वरुपात कसे लिहाल? वि: 35/100 शि: बरोबर. आणि 80% कसे लिहाल? वि: 80/100 शि: छान ! अपूर्णांकाच्या रूपातील माहिती शेकडेवारी मध्ये लिहिणे: मुलांनो आपण शेकडेवारीची माहिती अपूर्णांकात कशी लिहितात ते पाहिले. आता याउलट म्हणजेच अपूर्णांकाच्या रूपातील माहिती शेकडेवारीमध्ये कशी लिहितात ते आपण पाहू. यासाठी आपण प्रथम ¾ या अपूर्णांकाचे शेकडेवारीमध्ये रुपांतर करू. या मध्ये छेद 100 करण्यासाठी आपल्याला अशी संख्या निवडावी लागेल की जिला 4 ने गुणले तर मिळणारी संख्या 100 होईल. म्हणून आपण 25 ही संख्या घेतली. 25 चोक 100. आणि जर आपण छेदाला 25 ने गुणले तर आपल्यला अंशाला पण 25 ने गुणावे लागेल. म्हणून ¾ = 3×25 / 4×25 = 75/100 म्हणजेच 75% होतात. तर अशाप्रकारे आपण अपूर्णांकाच्या रूपातील माहिती शेकडेवारी मध्ये लिहू शकतो. चला आता मी तुम्हाला काही अपूर्णांक सांगते. त्याचे तुम्ही शेकडेवारी मध्ये रुपांतर करा. अपूर्णांक आहे 2/5 वि: सर छेद 100 येण्यासाठी आपण जर 20 ने 5 ला गुणले तर छेद 100 होईल. आणि छेदाला 20 ने गुणायचे म्हणून अंशाला पण 20 ने गुणावे लागेल. म्हणून 2/5 = 2×20 / 5×20 = 40/100 म्हणजे 40% झाले. अगदी बरोबर !