शेकडेवारी

शाब्दिक उदाहरणे

views

4:36
शाब्दिक उदाहरणे शि: उदाहरण 1 : गेल्या वर्षी गिरीप्रेमी गटाने वृक्षारोपण कार्यक्रमात 75 झाडे लावली. त्यापैकी 48 झाडांचे संवर्धन उत्तम रीतीने झाले. कर्मवीर गटाने 50 झाडे लावली होती. त्यापैकी 35 झाडांचे संवर्धन उत्तम रीतीने झाले. तर झाडांचे संवर्धन करण्यात कोणता गट जास्त यशस्वी झाला ? उत्तर: पाहा मुलांनो, सुरवातीला दोन्ही गटांनी लावलेल्या झाडांची संख्या वेगवेगळी दिसते आहे. त्यामुळे या लावलेल्या झाडांचा आणि संवर्धन झालेल्या झाडांचा दोन्हींचा विचार करायला हवा. ही तुलना करण्यासाठी संवर्धन झालेल्या झाडांची शेकडेवारी काढणे उपयोगी ठरेल. त्यासाठी संवर्धन झालेल्या झाडांचे, लावलेल्या झाडांशी गुणोत्तर पाहू. यासाठी गिरीप्रेमी गटाने लावलेल्या झाडांपैकी चांगले संवर्धन झालेली झाडे A % टक्के असे मानू. आणि कर्मवीर गटाने लावलेल्या झाडांपैकी चांगले संवर्धन झालेली झाडे B % टक्के असे मानू. गिरीप्रेमी गटासाठी संवर्धन झालेली झाडे व लावलेली झाडे यांचे गुणोत्तर प्रमाण A/100 म्हणजेच 48/75 आहे. याचे समीकरण A/100 = 48/75 असे मिळते. हे समीकरण आपण सोडवू. A/( 100) x × 100 = 48/█(75@ 3 )x × 1004 = (48 x× 4)/3 = 192/3 = 64 = म्हणून A = 64 म्हणून गिरीप्रेमी या गटाने 64% टक्के झाडांचे उत्तम संवर्धन केले . तर कर्मवीर गटासाठी संवर्धन झालेली झाडे व लावलेली झाडे यांचे गुणोत्तर प्रमाण B/100 म्हणजेच 35/50 आहे. याचे समीकरण B/100 = 35/50 असे मिळते. हे समीकरण आपण सोडवू. B/100 x× 100 = 35/█(50@ @1 1) x× 1002 B = 35 x× 2 = 70. B = 70 म्हणून कर्मवीर या गटाने 70% टक्के झाडांचे उत्तम संवर्धन केले . तर पहा गिरीप्रेमी या गटाने 64% झाडांचे संवर्धन केले आणि कर्मवीर गटाने 70% झाडांचे संवर्धन केले. म्हणून या दोन्ही गटांमध्ये झाडांचे संवर्धन करण्यात कर्मवीर हा गट जास्त यशस्वी झाला.