बीजगणिताची पूर्वतयारी

प्रस्तावना

views

4:40
आजपर्यंत आपण संख्यांवरील क्रियांचा अभ्यास केला. गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी करण्यासाठी अंकांचा वापर करून उत्तरे कशी काढावी ते शिकलो. आज आपण बीजगणिताची पूर्व तयारी करणार आहोत. मला सांगा, या फूलांच्या चित्रांतील कोणते फूल तुम्हाला आवडले? वि: सर मला ते फूल आवडले. त्या लाल फूलाच्या शेजारचे. वि: सर, मला ते दुसऱ्या ओळीतले फूल आवडले वि: सर मला ते कळी सोबत असलेले फूल आवडले. शि: पाहिलंत, प्रत्येकाला नेमके फूल कोणते आवडले ते सांगता आले नाही. यासाठी प्रत्येकाला स्पष्टीकरण द्यावे लागले. पण या ठिकाणी जर प्रत्येक फूलाच्या चित्राखाली मी या फूलांची नावे लिहिली असती किंवा या फूलांना क्रमांक दिला असता तर निश्चितच तुम्ही ठामपणे सांगू शकला असता की मला गुलाब आवडला. मला मोगरा आवडला किंवा मला 4 थ्या क्रमांकाचे फूल आवडले वगैरे.... वगैरे....अशाप्रकारे अक्षर किंवा अंकांचा वापर केला? की आपण सोप्या पद्धतीने सांगू शकतो बीजगणितातही असेच असते. तर बीजगणित म्हणजे संख्या आणि अक्षरांचा वापर करून मांडलेले गणित होय.