बीजगणिताची पूर्वतयारी

सरावासाठी उदाहरण सोडवू

views

2:56
आता आपण सरावासाठी काही उदाहरणे सोडवू. यासाठी तुम्ही बेरीज 13 येईल अशा संख्याच्या तीन जोडया, कंसाचा वापर करून लिहा. त्यावरून वेगवेगळ्या समानता लिहा. वि: बाई यासाठी प्रथम आपल्याला 13 बेरीज येतील अशा संख्या शोधाव्या लागतील. तर (10 + 3)= 13 (8 + 5)=13 आणि (7 + 6) = 13 अशा या संख्या आहेत. आणि यातील समानता आहे : 8+5 = 6+7 ; किंवा 10+3 = 6+7 ; आणि 10+3 = 8+5. शि: अगदी बरोबर! आता बेरीज 20 येईल अशा संख्याच्या तीन जोडया कंसाचा वापर करून लिहा. यावरून तीन वेगवेगळ्या समानता लिहा. वि: बेरीज 20 येईल अशा संख्या आहेत, (10 + 10) = 20, (18 + 2) = 20, (17 + 3) = 20, (12 + 8) = 20, (11 + 9) = 20, आणि (13 + 7) = 20. यातील समानता आहे (10 + 10) = (12 + 8) ; (11 + 9) = (13 + 7) ; किंवा (15 + 5) = (19 + 1) शि: छान! सगळ्यांनी अगदी बरोबर उत्तर दिली आहेत. आता बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यापैकी प्रत्येक क्रिया करून 18 ही संख्या मिळेल अशा संख्याच्या चार जोडया लिहा. त्यावरून चार वेगवेगळ्या समानता लिहा.