भौमितिक रचना Go Back उदाहरणे सोडवूया views 2:07 आता पर्यंत आपण कोनदुभाजक, रेषाखंडाचा लंबदुभाजक, तसेच त्रिकोणाच्या कोनांच्या दुभाजकांचे गुणधर्म आणि त्रिकोणाच्या बाजूच्या लंबदुभाजकांचे गुणधर्म अभ्यासले. आता आपण काही उदाहरणे सोडवूया.उदा 1: 5.3 सेमी लांबीचा रेषाखंड काढून त्याचा लंबदुभाजक काढा. कृती : a) प्रथम पट्टीच्या साहाय्याने 5.3 सेमी लांबीचा रेषाखंड काढा. त्याला ST हे नाव द्या. b) कंपासमध्ये दिलेल्या रेषाखंडाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन, बिंदू S आणि T च्या वरच्या तसेच खालच्या दिशेने एकमेकांस छेद्तील असे कंस काढा.c. दोन्ही छेदनबिंदूंना P आणि Q ही नावे देऊन जोडा. d. पहा PQ मुळे रेषाखंड ST चे दोन समान भाग झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच PQ हा रेषाखंड ST चा लंबदुभाजक आहे. उदा. 2 : आता आपण काटकोन त्रिकोणाच्या भुजांचे लंबदुभाजक काढू. यासाठी प्रथम ABC हा काटकोन त्रिकोण काढा. आता या त्रिकोणाच्या भुजांचे लंबदुभाजक काढा. लंबदुभाजक काढण्याची कृती आपण शिकलो आहोत. त्याच पद्धतीने कंपासमध्ये रेषेच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन रेषेच्या दोन्ही बाजूना कंस काढा. आता अंतर तेच ठेवून रेषेच्या दुसऱ्या टोकावर कंपासचे लोखंडी टोक ठेवून पहिल्या कंसाला छेद्णारे दुसरे कंस काढा. या पद्धतीने आपण तीनही बाजूंचे लंबदुभाजक काढून घेऊ. तीनही लंबदुभाजक एकाच बिंदूतून जातात. त्या बिंदूला D हे नाव द्या. प्रस्तावना त्रिकोणाच्या कोनांच्या दुभाजकांचा गुणधर्म उदाहरणे सोडवूया त्रिकोण रचना त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूची लांबी कर्ण व एका बाजूची लांबी रेषाखंडांची एकरूपता कोणाची एकरूपता