भौमितिक रचना

दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूची लांबी

views

3:32
दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूची लांबी दिली असता त्रिकोण काढणे.मुलांनो, याआधी आपण त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन दिला असता त्रिकोण कसा काढायचा, हे पाहिले. आता आपण दोन कोन आणि त्यांना समाविष्ट केलेल्या बाजूची लांबी दिली असता त्रिकोण कसा काढायचाआता आकृती काढताना कच्च्या आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे कृती करू.कृती -: 1. पाया AB = 7 सेमी काढा. 2. कोनमापकाच्या साहाय्याने किरण AT असा काढा की m TAB=900 चा काटकोन तयार होईल. 3. आता रेख BA च्या ज्या बाजूला बिंदू T आहे, त्याच बाजूला किरण BP असा काढा की, m PBA = 50० चा कोन तयार होईल.4. हा कोन कोनमापकाच्या साहाय्याने काढा. 5. आता किरण AT व किरण BP ज्या बिंदूत जोडले आहेत त्या छेदनबिंदूला c हे नाव द्या. पहा ABC हा दिलेल्या मापाचा त्रिकोण तयार झाला.