भौमितिक रचना Go Back कर्ण व एका बाजूची लांबी views 3:07 कर्ण व एका बाजूची लांबी दिली असता काटकोन त्रिकोण काढणे. मुलांनो त्रिकोणामध्ये एक कोन काटकोन असेल, तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. हे आपल्याला माहीत आहे. अशा त्रिकोणात काटकोनासमोरील भुजा म्हणजेच कर्ण होय. तर आता आपण कर्ण व एका बाजूची लांबी दिली असता काटकोन त्रिकोण कसा काढायचा हे पाहू. उदा. ABC असा काढा की, m ABC= 90०, कर्ण=9 सेमी l (BC)=5 सेमी. असेल. प्रथम दिलेल्या मापाची कच्ची आकृती काढा. यात पाया BC=5 सेमी व m B=90० दाखवा. कर्ण 7 सेमी दाखवा. पहा ही झाली आपली कच्ची आकृती तयार. कृती :- 1. कच्च्या आकृतीत दाखविल्याप्रमाणे पाया BC हा 5 सेमी काढा. 2. कोनमापकाच्या साहाय्याने किरण BP हा 90० चा काढा. 3. कंपासमध्ये 7 सेमी अंतर घेऊन कंपासचे लोखंडी टोक c वर ठेवून किरण BP ला छेद्णारा कंस काढा. 4. मिळालेल्या छेदनबिंदूला A नाव द्या. 5. पटटीच्या साहाय्याने बिंदू A आणि C जोडा. 6. ABC दिलेल्या मापानुसार तयार झाला. प्रस्तावना त्रिकोणाच्या कोनांच्या दुभाजकांचा गुणधर्म उदाहरणे सोडवूया त्रिकोण रचना त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूची लांबी कर्ण व एका बाजूची लांबी रेषाखंडांची एकरूपता कोणाची एकरूपता