मसावी लसावी

महत्तम सामाईक विभाजक

views

3:37
महत्तम सामाईक विभाजक (मसावि)मुलांनो, तुम्हाला हे माहीतच आहे की, मसावि म्हणजे दिलेल्या संख्यांचा सर्वात मोठा सामाईक विभाजक असतो. उदा. जर आपल्याला 60 आणि 75 या संख्यांचा मसावि काढायचा असेल तर प्रथम आपण 60 चे सर्व विभाजक लिहू : 1, 2, 3, 4, 5, 6, 10, 12, 15, 20, 30, आणि 60. यानंतर 75 चे विभाजक लिहू :1, 3, 5, 15, 25 आणि 75. आता या दोन्ही संख्यांमधील सामाईक विभाजक लिहू.ते आहेत : 1,3,5,15. पहा यातील सर्वात मोठा विभाजक आहे 15. म्हणून 60 आणि 75 या संख्यांचा मसावि 15 आहे. अशाप्रकारे मसावि काढणे आपण इयत्ता ६वी मध्ये शिकलो आहोत. मुलांनो जेव्हा संख्या मोठ्या असतात तेव्हा त्यांचे सर्व विभाजक लिहून मसावि काढणे किचकट असते. अशावेळी जर आपण अवयव पाडून मसावि काढला तर ते सोपे जाते.