मसावी लसावी Go Back मसावि काढण्याची भागाकार पद्धत views 3:54 मसावि काढण्याची भागाकार पद्धत: : मुलांनो, आता आपण भागाकार पद्धतीने मसावि कसा काढतात त्याचा अभ्यास करू. उदा.1) 144 व 252 चा मसावि काढा. 1) प्रथम मोठ्या संख्येला लहान संख्येने भागायचे आहे. म्हणजेच यातील 252 या मोठ्या संख्येला 144 या लहान संख्येने भागले असता भागाकार 1 आला आणि बाकी 108 शिल्लक राहिली. पण हे लक्षात ठेवा की भागाकारामध्ये बाकी नेहमी भाजकापेक्षा लहान असली पाहिजे तरच भागाकार बरोबर असतो. 2) आता या भागाकारात मिळालेल्या बाकीने म्हणजेच 108 ने आधीच्या भाजकाला म्हणजेच 144 ला भागले. तर 1 चा भाग लागून बाकी 36 शिल्लक राहिली. 3) पुन्हा 108 या भाजकाला बाकी 36 ने भागले. तर भागाकार 3 मिळून बाकी शून्य राहिली. 4) या प्रमाणे बाकी शून्य मिळेपर्यत ही क्रिया केली. तर ज्या भागाकारात बाकी शून्य मिळेल त्या भागाकारातील भाजक हा दिलेल्या संख्याचा मसावि असतो. म्हणून 144 व 251 यांचा मसावि 36 आहे उजळणी सहमूळ संख्या संख्येचे मूळ अवयव पाडणे महत्तम सामाईक विभाजक तीन संख्यांचा मसावि काढणे मसावि काढण्याची भागाकार पद्धत लघुत्तम सामाईक विभाज्य(लसावी) मसावि व लसावि मूळ अवयव पद्धत लसावि आणि मसावि यांचा व्यवहारातील उपयोग बेरीज करा.रीत 1 उदाहरण