मसावी लसावी

उदाहरण

views

3:21
उदाहरण : एका संख्येला अनुक्रमे 8,10,12,14 या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी 3 उरते तर अशी लहानात लहान संख्या कोणती आहे? या सर्व संख्यांचा लसावि आपण कोष्टक पद्धतीने काढू. या सर्व संख्यांना 2 ने भाग जातो. म्हणून नवीन संख्या झाल्या 4, 5, 6, 7 आता यातील कमीत कमी 2 संख्यांना 2 ने भाग जातो. आणि ज्यांना भाग जात नाही त्या दोन्ही संख्या तशाच खाली घेतल्या. म्हणून आता आपल्या संख्या झाल्या आहेत. 2, 5, 3, 7. आता या सर्व संख्यांना समान असणारा केवळ 1 हा एकच विभाजक आहे. 2 8 10 12 14 2 4 5 6 7 2 5 3 7 म्हणून आता उभ्या स्तंभातील वा आडव्या स्तंभातील संख्यांचा गुणाकार करून त्यांचा लसावि मिळवू. म्हणून लसावि = 2 x 2 x 2 x 5 x 3 x 7 = 840 आता आलेल्या लसावि मध्ये प्रत्येक वेळी मिळणारी बाकी मिळवू. म्हणून लसावि + बाकी = ती संख्या 840 + 3 = 843 म्हणून 8,10,12,14 या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी 3 उरते अशी लहानात लहान संख्या 843 आहे .