सूर्य, चंद्र व पृथ्वी

चंद्रकला

views

2:31
चंद्रकला म्हणजे चंद्रबिंबाचा प्रकाशित भाग होय. किंवा असेही म्हणता येईल की चंद्रकला म्हणजे पृथ्वीवरून दिसणाऱ्या चंद्राच्या प्रकाशित भागाचा रोज बदलणारा आकार होय. तर या चंद्रबिंबाचा आकार आकाशात अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत हळूहळू वाढत जातो. व पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत हळूहळू कमी होत जातो. तुम्हांला सूर्यकिरणे, पृथ्वी आणि पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतानाचा चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग दाखविला आहे. तसेच अमावास्या, अष्टमी आणि पौर्णिमेच्या दिवशी दिसणाऱ्या चंद्रकला दाखविल्या आहेत. तसंच या आकृतीत त्या-त्या दिवशीची चंद्र, पृथ्वी व सूर्य यांची सापेक्ष स्थितीदेखील दाखवली आहे. आपण पृथ्वीवरून आकाशात चंद्रकला पाहत असतो. त्या चंद्रबिंबाचे प्रकाशित भाग असतात. हे भाग चंद्रावरून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे आपल्याला दिसतात. त्यामुळे आपण चंद्रकला पाहू शकतो.