वृष्टी Go Back गारा views 4:02 भूपृष्ठावर जास्त उष्णता असताना ऊर्ध्वगामी हवेचा प्रवाह जोरात वाहतो. म्हणजे भूपृष्ठाकडून आकाशाकडे हवेचा प्रवाह जोरात वाहतो. या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे हवेचे तापमान कमी होते. हवा थंड होऊन हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन घडून येते म्हणजे बाष्पाचे जलकणांत रूपांतर होते. भूपृष्ठाकडून येणाऱ्या हवेच्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे हे जलकण उंचावर जातात. त्या ठिकाणी जलकणांचे घनीभवन होऊन गारांची निर्मिती होते. घनीभवन होणे म्हणजे जलाचे घनरूपात रूपांतर होणे. गारा या जलकणांपेक्षा वजनाने जड असल्याने त्या भूपृष्ठाकडे येऊ लागतात. परंतु हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे त्या पुन्हा वर नेल्या जातात. वर गेल्यानंतर तेथे गारांवर हिमाचे नवीन थर साचतात. असे अनेक वेळा घडते, त्यामुळे गारा आकाराने मोठया होत जातात आणि त्या मोठया होत असताना त्यांच्यामध्ये अनेक समकेंद्री थर तयार होतात. समकेंद्री थर म्हणजे गारा तयार होत असताना ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे त्या सतत वरखाली होत राहतात. जास्त उंचीवर गेल्याने त्यांच्याभोवती बर्फाचा नवा थर साचतो. ही क्रिया पुन्हा पुन्हा घडल्याने गारांवर एकावर एक असे अनेक थर तयार होतात. अशा थरांना समकेंद्री थर असे म्हणतात. हिमाचे थरांवर थर साचल्याने या गारा मोठया होतात. नंतर वजन वाढल्यावर गुरुत्वाकर्षणामुळे वेगाने त्या जमिनीवर येतात. गारांच्या या वृष्टीला आपण गारपीट म्हणतो. गारपिटीमुळे अनेकदा पिकांचे अतोनात नुकसान होते, काढणीला आलेली पिके भुईसपाट होतात. तसेच जीवित आणि वित्तहानी होते. सांगा पाहू भाग 1 सांगा पाहू भाग 2 वृष्टी गारा पाऊस आवर्त पाऊस आरोह किंवा अभिसरण पाऊस पर्जन्य मापक धुके, दव आणि दहिवर वृष्टीचे परिणाम