वृष्टी Go Back आरोह किंवा अभिसरण पाऊस views 4:38 सूर्याची किरणे विषुववृत्तावर लंबरूप पडतात. त्यामुळे भूपृष्ठालगतची हवा तापते. ही हवा तापल्याने प्रसरण पावून हलकी होते नि ती वर जाऊ लागते. उंच गेल्यावर ही हवा थंड होते. कारण जसजसे वर जावे तसतसे तापमान कमी कमी होत जाते. हवा थंड झाल्याने तिची बाष्पधारणक्षमता कमी होते. त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकण बनतात व त्यापासून पाऊस पडतो. विषुववृत्तीय प्रदेशात असा पाऊस बहुधा दररोज दुपारनंतर पडतो. कारण विषुववृत्तावरील तापमानात जास्त बदल होत नाही. त्यामुळे एकच क्रिया सतत घडते. अशा प्रकारच्या पावसात म्हणजे आरोह पावसात विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होतो. या प्रकारच्या पावसाचा प्रदेश पृथ्वीवर खूपच मर्यादित आहे. उदाहरणार्थ आफ्रिकेतील कांगो नदीचे खोरे आणि दक्षिण अमेरिकेतील अॅमेझोन नदी खोऱ्याच्या विषुववृत्तीय भागामध्ये असा आरोह प्रकारचा पाऊस पडतो. हवेच्या अभिसरण क्रियेमुळे विषुववृत्तीय भूभागात बहुधा दुपारनंतर पाऊस पडतो; परंतु तेथील समुद्रावर अभिसरण पाऊस दुपारी पडत नाही. कारण पाणी व भूपृष्ठ तापण्याचे परिमाण वेगवेगळे आहेत. भूपृष्ठ लवकर तापते त्या तुलनेत पाणी सावकाश तापते. विषुववृत्तीय प्रदेशात सूर्यकिरणे वर्षभर लंबरूप पडतात आणि तापमानही जास्त असते. तेथील भूपृष्ठ दुपारपर्यंत खूपच तापते. त्यावरील हवा गरम होऊन वरती जाते. तिची रिकामी जागा पाण्यावरील हवा भरून काढते. त्यामुळे जमिनीवर अभिसारण पाऊस पडत असला तरी विषुववृत्तीय समुद्रावर दुपारी अभिसरण पाऊस पडत नाही. सांगा पाहू भाग 1 सांगा पाहू भाग 2 वृष्टी गारा पाऊस आवर्त पाऊस आरोह किंवा अभिसरण पाऊस पर्जन्य मापक धुके, दव आणि दहिवर वृष्टीचे परिणाम