परिमेय संख्या व त्यावरील क्रिया Go Back परिमेय संख्यांचे दशांश रूप views 2:53 परिमेय संख्यांचे दशांश रूप (Decimal Representation of Rational Numbers ) - मुलांनो, आता आपण परिमेय संख्या दशांश रूपात कशाप्रकारे लिहिता येतील, हे पाहू. 7 ही संख्या 7.0 किवा 7.00 अशी ही आपण लिहू शकतो. कारण अपूर्णांकी भागानंतर कितीही शून्ये दिली तरी त्याची किंमत बदलत नाही. आपण आता एक उदाहरण सोडवू: 7/( 4 ) ही परिमेय संख्या दशांश रूपात लिहू. या उदाहरणात प्रथम आपण 7 ला 4 ने भाग देऊ. हा भाग दिल्यावर 1 चा भाग लागला व बाकी 3 उरते. आता 1 या पूर्णांकानंतर दशांश चिन्ह लिहू. बाकी 3 च्या पुढे भाज्यातील 0 लिहून 30 ला 4 ने भागू, आता येणारा भागाकार हा अपूर्णांक भाग आहे. म्हणून भागाकारात दशांश चिन्हानंतर 7 लिहू. आता भाज्यातील अजून एक 0 खाली घेऊन 20 ला 4 ने भाग देऊन भागाकार पूर्ण करू. म्हणून 7/44 = 1.75 प्रस्तावना परिमेय संख्यांवरील क्रिया परिमेय संख्यांचा गुणाकार परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या (भाग 1) दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार परिमेय संख्यांचे दशांश रूप पद्धत 2 परिमेय संख्यांचे दशांशरूप - आवर्ती दशांशरूप पदावली व पदावली सोडवण्याचे नियम पदावलीची उदाहरणे