परिमेय संख्या व त्यावरील क्रिया

पद्धत 2

views

2:39
पद्धत 2: 7 3/5 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकांत रुपांतर करू. ते करण्यासाठी आपण 7 ने 5 ला गुणू. 7 × 5 = 35. यामध्ये अंशातील 3 मिळवू. एकूण झाले 38. म्हणून 7 3/5 चे रूपांतर 38/5 झाले. आता 38 ला 5 ने भागू. पहा 38 ला 5 ने भागले असता भाग लागला 7 चा. म्हणून भागाकारात 7 लिहिले. आणि 38 मधून 35 वजा केले. उरले 3. आता 3 मधून 5 वजा होणार नाही म्हणून भाज्यातील शून्य खाली घेतला. आता 30 ला 5 ने भाग लावला असता भाग लागला 6 चा म्हणून भागाकारात दशांश चिन्हानंतर 6 लिहिले. 30 मधून 30 वजा केले तर बाकी शून्य राहिली. म्हणून 38/5 = 7.6 आहेत.