बैजिक राशी Go Back बैजिक राशींचे प्रकार views 2:44 बैजिक राशींचे प्रकार : मुलानो आता आपण बैजिक राशींचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत ते पाहू. प्रकार : राशीत असलेल्या पदांच्या संख्येवरून त्या राशीचे नाव ठरत असते. एखाद्या राशीत एकच पद असेल तर ती राशी एकपद राशी असते. उदा 4x , 5m/6 ,7p. या सर्व राशींमध्ये केवळ एकच पद आहे.ज्या राशीत दोन पदे असतात. ती राशी द्विपद राशी असते. उदा, 2x – 3y, 2l + 2b, 3yz + 5pq. पाहा या सर्व राशीत दोन पदे आहेत.ज्या राशीत तीन पदे असतात. त्या राशीस त्रिपद राशी असे म्हणतात. उदा. x2- 5x + 6, a + b + c, 8a2 – 7a3b + c. पहा या सर्व राशीत तीन पदे आहेत.आणि ज्या राशीत तीनापेक्षा जास्त पदे असतात, अशा राशींना बहुपद राशी असे म्हणतात. उदा. x2+ 3ab + 4b2 + y + 4 + 4x3 – 7x2 + 8x3. ही बहुपदी राशी आहे. प्रस्तावना चल, सहगुणक (Coefficient) व पद बैजिक राशींचे प्रकार बैजिक राशींची बेरीज द्विपद राशीची बेरीज बैजिक राशींची वजाबाकी बैजिक राशींची उदाहरणे बैजिक राशींचा गुणाकार द्विपदीला द्विपदीने गुणणे एकचल समीकरण