बैजिक राशी

द्विपद राशीची बेरीज

views

3:45
द्विपद राशीची बेरीज: द्विपद राशींची बेरीज कशी करायची ते काही उदाहरणातून पाहू. ही उदाहरणे आपण दोन प्रकारच्या मांडणीने सोडवू. उदा 1: (2x + 4y) + (3x + 2y). प्रथम आपण हे गणित आडव्या मांडणीत सोडवू. (2x + 4y) + (3x + 2y) = 2x + 3x + 4y + 2y (इथे आपण सरूप पदे एकत्र केली) = 5x + 6y (सरूप पदांची बेरीज केली) उदाहरण 2 – आडवी मांडणी ( 3p2 + 5q ) + (5p2 + 7q ) =3p2 + 5p2 + 7q +5q याठिकाणी आपण सर्व सरूप पदे एकत्र घेतली. =8p2 + 12q सरूप पदे एकसारखी घेतल्यानंतर त्यांची बेरीज केली.