बैजिक राशी Go Back बैजिक राशींची वजाबाकी views 4:32 बैजिक राशींची वजाबाकी (Subtraction of algebraic expressions) - मुलांनो, आतापर्यंत आपण बैजिक राशींची बेरीज कशा प्रकारे करतात ते पाहिले. आता आपण बैजिक राशीची वजाबाकी कशी करायची ते पाहू. पूर्णांकांची वजाबाकी करताना एका पूर्णांकातून दुसरा पूर्णांक वजा करणे, म्हणजे पहिल्या पूर्णांकात दुसऱ्या पूर्णांकाची विरुद्ध संख्या मिळवणे. याच नियमाचा वापर आपण बैजिक राशींची वजाबाकी करण्यासाठी करणार आहोत. उदाहरणार्थ: 18 – 7 = 18 + (-7) = 11 होते. येथे 18 या पहिल्या संख्येतून 7 ही दुसरी संख्या वजा करणे म्हणजे 7 ची विरूद्ध संख्या (-7) मिळवणे. तसेच 9x – 4x = [ 9 + ( -4 )]x = 5x असते. तेव्हा येथे 9 मधून 4 वजा करणे म्हणजे 4 ची विरुद्ध संख्या (-4) मिळवणे. आता हे उदाहरण पहा, म्हणजे तुम्हाला बैजिक राशींची वजाबाकी कळेल. मात्र हे लक्षात ठेवा की, जी राशी वजा करायची त्या राशीतील प्रत्येक पदाचे चिन्ह बदलून बेरीज करायची असते. थोडक्यात कंसाच्या बाहेर जर – (ऋण) चिन्ह असेल तर कंसातील प्रत्येक पदाचे चिन्ह बदलते प्रस्तावना चल, सहगुणक (Coefficient) व पद बैजिक राशींचे प्रकार बैजिक राशींची बेरीज द्विपद राशीची बेरीज बैजिक राशींची वजाबाकी बैजिक राशींची उदाहरणे बैजिक राशींचा गुणाकार द्विपदीला द्विपदीने गुणणे एकचल समीकरण