बैजिक राशी

बैजिक राशींची उदाहरणे

views

2:11
मुलांनो चला सरावासाठी काही बैजिक राशींची उदाहरणे सोडवू.उदा पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा करा. (4xy – 9z ) ; ( 3xy – 16z) = (4xy – 9z ) - (3xy - 16z) = 4xy – 9z - 3xy + 16z कंस काढताना दुसऱ्या कंसातील राशीतील प्रत्येक पदाचे चिन्ह बदलले.= (4xy – 3xy) + (- 9z + 16z ) येथे सरूप पदे जवळ घेतली. सरूप पदे जवळ घेताना चिन्हासकट घ्यावी. = Xy + 7z हे उत्तर मिळाले.उदाहरण ( 5x + 4y + 7z ) – ( x +2y + 3z ) = 5x + 4y + 7z - x -2y - 3z कंस काढून टाकताना दुसऱ्या कंसातील प्रत्येक पदाचे चिन्ह बदलले म्हणजेच x +2y + 3z ची विरुद्ध संख्या मिळवली. = (5x- x ) + (4y – 2y) + (7z -3z) येथे चिन्हासाहित सरूप पदे जवळ घेतली. = 4x + 2y + 4z हे उत्तर मिळाले.