संविधानाची वैशिष्ट्ये

प्रस्तावना

views

3:26
आपण आतापर्यंत संविधान म्हणजे काय? ते कोणी तयार केले? त्यासाठी केलेली योजना, या सर्व गोष्टींवर चर्चा केली. तसेच आपण संविधानाची उद्देशिका आणि त्यामध्ये नमूद केलेल्या संज्ञा यांचा अर्थ समजावून घेतला. सार्वभौम म्हणजे काय? समाजवाद, धर्मनिरपेक्षता, गणराज्य, सार्वभौमत्व, यांसारख्या शब्दांचा अर्थ काय, या सर्व गोष्टी समजून घेतल्या. या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास केल्यास आपल्याला पटते की भारतीय संविधान हे एक परिपूर्ण संविधान आहे. या पाठात संविधानाची आणखी काही वैशिष्टये आपण पाहणार आहोत. संघराज्य: संघराज्य व्यवस्था हे आपल्या संविधानाचे एक महत्त्वाचे वैशिष्टय आहे. आपला देश विस्ताराने खूप मोठा आहे. सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या देशांपैकी एक देश आहे. लोकसंख्येच्या बाबतीत जगात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. तर विस्ताराच्या बाबतीत आपला देश जगातील सातव्या क्रमांकावर आहे.देशाचा राज्य कारभार सुरळीत चालावा, सर्व घटकांकडे पुरेसे लक्ष दिले जावे, तसेच सर्व घटकांना, त्यांच्या प्रतिनिधींना राज्यकारभारात सहभागी होता यावे म्हणून देशाचा कारभार दोन पातळ्यांवरून केला जातो. 1 ) संघशासन किंवा केंद्रशासन 2) राज्यशासन किंवा घटकराज्य. तर अशा दोन स्तरांवर राज्यकारभार चालणाऱ्या पद्धतीस ‘संघराज्य पद्धती’ असे म्हणतात. परराष्ट्रांशी व्यवहार करणे,शांतता प्रस्थापित करणे, चलन व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय व्यापार इत्यादी कामे केंद्रशासनाला करावी लागतात. हे सर्व करत असताना देशातील रोजगार, शिक्षण, व्यक्तिगत कायदा, आर्थिक व सामाजिक नियोजन याचीही जबाबदारी केंद्रशासनावर असतेच. तसेच आपण ज्या राज्यात राहतो, त्या प्रदेशाचा राज्यकारभार पाहणाऱ्या शासनाला राज्यशासन असे म्हणतात.