भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल

दुसरा टप्पा भाग १ : १९९१ ते आजपर्यंत

views

3:44
1. मुलांनो परराष्ट्र धोरणाच्या पहिल्या टप्प्यात आपण बघितले की भारताने मर्यादित गोष्टींनाच प्राधान्य दिले होते. परंतु भारताचे दुसऱ्या टप्पातील परराष्ट्र धोरण अधिक व्यापक आणि गतिशील बनले. भारताने यात अनेक घटकांचा समावेश केला. उदा. अर्थकारण, व्यापार, शिक्षण, तंत्रज्ञान अशा अनेक गोष्टींचा त्यात समावेश केला. शीतयुद्धानंतरच्या काळात राजकीय व लष्करी संबंधांना प्राधान्य राहिले नाही. १९९१ नंतर भारताने मुक्त आर्थिक धोरण स्वीकारले. त्यामुळे आर्थिक व्यवस्थेवरील सरकारी नियंत्रण कमी झाले. त्यामुळे उद्योगधंदे, व्यवसाय, व्यापार यांना चालना मिळाली. त्यामुळे भारताशेजारील राष्ट्रांबरोबरच्या व्यापारात वाढ झाली. त्यामुळे जागतिक व्यापारात आपला सहभाग वाढला व देशाच्या आर्थिक विकासदरात वाढ होण्यासाठी प्रयत्न होऊ लागले. देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच इंग्रजीत त्याला ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट (जीडीपी) असे म्हणतात. G.D.P हा एक मूलभूत निर्देशांक आहे. विशिष्ट कालावधीत देशांतर्गत उत्पादित सर्व वस्तू आणि सेवांचे रुपयातील मूल्य दर्शविण्याचे हे परिमाण आहे. जीडीपीवरून मागच्या वर्षापेक्षा किंवा तिमाहीपेक्षा देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न या वर्षी किती वाढले वा कमी झाले ते समजते. त्याची टक्केवारी काढली असता आपल्याला देशाचा आर्थिक विकास दर समजतो. २०१६-१७ मध्ये भारताचा आर्थिक विकास दर ७.१ एवढा होता. विकास दर हा सतत बदलत असतो. कधी तो वाढणारा असतो तर कधी कमी होणारा असतो. १९९० नंतरच्या दशकात म्हणजे दुसऱ्या टप्प्यात भारताने खुली अर्थव्यवस्था व जागतिकीकरण यांसारख्या धोरणांचा स्वीकार केल्याने १९९० नंतरच्या दशकात भारताचे आग्नेय आशियाई देशांशी म्हणजेच, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम इ. राष्ट्रांशी असणारे आर्थिक संबंध अधिक मजबूत झाले. इस्त्राईल, जपान, चीन व युरोपीय संघ (EU) यांच्याशी असणारी आपली देवाणघेवाण वाढत गेली. तसेच भारत अनेक आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरील आर्थिक संघटनाचा सभासद झाला. उदा. जी -२० संघटना: ही जगातील २० बलाढ्य आर्थिक सत्तांची संघटना असून याचे मुख्यालय दरवर्षी वेगवेगळ्या देशात असते. यामध्ये अमेरिका, जपान, इंग्लंड, चीन, जर्मनी, भारत यांसारखे देश आहेत. तसेच BRICS (ब्रिक्स) संघटना – या संघटनेत जगातील पाच देश आहेत. त्यामध्ये Brazil, Russia, India, China, South Africa ही राष्ट्रे आहेत. या राष्ट्रांच्या नावातील पहिल्या अक्षरांवरून या संघटनेस BRICS हे नाव देण्यात आले आहे. याचे मुख्यालय चीनमधील शांघाय येथे आहे.