घरोघरी पाणी

प्रस्तावना

views

2:53
आपण रोजच्या जीवनात अनेक कारणांसाठी पाणी वापरतो. त्यात महत्त्वाचा पाण्याचा वापर पिण्यासाठी करतो. पिण्यासाठी आपण निर्धोक पाण्याचा वापर करतो. अशुद्ध पाणी शुद्ध करून ते लोकांसाठी देणे हे खूप कष्टाचे व खर्चाचे काम आहे. त्यामुळे आपण पिण्याच्या व इतर कारणांसाठी लागणाऱ्या पाण्याचा वापर काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. आपल्याला पिण्यासाठी, अन्न शिजविण्यासाठी, आंघोळीसाठी, स्वच्छतेसाठी, कपडे धुण्यासाठी, भांडी घासण्यासाठी आणि बागकामासाठी पाणी लागते. तसेच शेती, उद्योग, कारखाने आणि वीज निर्मितीसाठी सुद्धा पाण्याची गरज असते. आपल्याला सतत पाण्याची गरज लागते. सकाळी नळाला पाणी आले की, आपण सर्वच कामे त्या वेळेत करू शकत नाही. गरजेनुसार आपल्याला दिवसभर पाणी लागते. त्यासाठी आपण पाणी घरात साठवून ठेवणे आवश्यक असते. पूर्वी घरी पाणी साठविण्यासाठी पितळेचे किंवा तांब्याचे हंडे, कळश्या आणि मातीपासून बनवलेली मडकी, रांजण वापरत होते. तसेच पाण्याचा साठा असावा म्हणून हौद, टाक्याही बांधायचे. आता मात्र स्टील व प्लॅस्टिकपासूनही पाणी साठवण्याची भांडी बनवतात.