सामाजिक व धार्मिक प्रबोधन

‘भारतीय प्रबोधन’

views

3:23
‘भारतीय प्रबोधन’:१८५७ च्या उठावातून हिंदी लोकांच्या मनातील इंग्रजांच्याबद्दलचा राग दिसून आला. जरी हा उठाव यशस्वी झाला नसला तरी तो हिंदुस्थानाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. यातून हिंदी लोकांना जाणीव झाली की आपल्या स्वातंत्र्यासाठी जुने नेतृत्व व जुन्या प्रेरणा उपयोगी पडणार नाहीत. याच दरम्यान देशात इंग्रजी शिक्षणाने सुजाण झालेला एक सुशिक्षित वर्ग उदयास आलेला होता. इंग्रजी शिक्षणामुळे आपल्या देशात नवे विचार, नवीन कल्पना, नवीन तत्वज्ञान यांचा प्रसार झाला. तसेच भारतीयांना पश्चिमे कडील लोकांची संस्कृती, विचार यांची ओळख झाली. भारतीयांना त्यांच्यातील व आपल्यातील फरक जाणवू लागला. त्यामुळे भारतीय समाजाच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक व सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रांत बदल झाले. इंग्रजी राजवट भारतात होती. त्यावेळी इथल्या समाजामध्ये अंधश्रद्धा, देव – धर्म, कर्मकांड यांसारख्या गोष्टी मोठ्या प्रमाणात रूढ होत्या. त्याकाळच्या लोकांत रूढीप्रियता मोठ्या प्रमाणात असलेली आढळून येते. या आपल्या समाजातील दोष, उणीवा, उच्च विचारांचा अभाव यांची जाणीव सुशिक्षित वर्गाला होऊ लागली. मग यासाठी समाजातील सुशिक्षित विचारवंत आपल्या लेखणीद्वारे जनजागृती करू लागले. आपल्या लिखणातून ते जुन्या विचारातील दोष समाजासमोर आणू लागले. त्यावेळच्या भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीला ‘भारतीय प्रबोधन’ असे म्हणतात.