सामाजिक व धार्मिक प्रबोधन

धर्मसुधारणा व समाजसुधारणेचे पर्व

views

5:19
धर्मसुधारणा व समाजसुधारणेचे पर्व: ब्राह्मो समाज: भारतातील पहिली किंबहुना हिंदु धर्मातील पहिली सुधारणा चळवळ ब्राह्मो समाजाची होती. राजाराम मोहन रॉय यांनी २० ऑगस्ट १८२८ मध्ये बंगाल प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना केली. रॉय यांनी अनेक भाषा व धर्मांचा अभ्यास केला होता. यातूनच त्यांची अद्वैतवादी विचारसरणी विकसित झाली.राजाराम मोहन रॉय यांनी सती प्रथा, बालविवाह, पडदा पद्धती यांना विरोध केला. पुढे त्यांनी लॉर्ड बेंटिंक यांच्या कारकिर्दीत पाठपुरावा करून सतीबंदी कायदा करवून घेतला. अशा वाईट प्रथेतून मुलींवर अन्याय होत असे, म्हणून त्यांनी त्याला विरोध केला. पडदा पद्धती म्हणजे मुलींनी घराबाहेर पडायचे नाही. स्त्रियांनी पुरुषांना आपला चेहरा दाखवायचा नाही. यांसारख्या चालिरीतींना त्यांनी जोरदार विरोध केला. राजाराम मोहन रॉय यांनी विधवांचे पुनर्विवाह, स्त्रियांचे शिक्षण यांसारख्या गोष्टींचे समर्थन केले. त्यांनी पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे हिंदु कॉलेजची स्थापना केली. त्याचप्रमाणे त्यांनी सुरू केलेल्या संवाद कौमुदी या वृत्तपत्राद्वारे समाजातील वाईट रूढी, चालीरीती, परंपरा यांच्याबद्दल लोकांच्यामध्ये जागृती निर्माण केली. प्रार्थना समाज: दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी इ.स १८४८ साली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली. पुढे परमहंस सभा विसर्जित करण्यात आल्यानंतर तिच्याच काही साभसादांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. यामध्ये प्रामुख्याने डॉ. आत्माराम पांडूरंग तर्खडकर, दादोबा पांडुरंग तर्खडकर व भास्कर पांडुरंग तर्खडकर या तीन तर्खडकर बंधूंचा सहभाग होता. या बंधूनी दि. ३१ मार्च १८६७ रोजी मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली. दादोबांचे बंधू डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. सुबोध पत्रिका या नावाचे मुखपत्रही प्रार्थना समाजाने चालविले होते.