सामाजिक व धार्मिक प्रबोधन

स्त्रीविषयक सुधारणा भाग १

views

4:37
"स्त्रीविषयक सुधारणा भाग १: समाजातील एक घटक सुधारणा, जागृती व हक्क यांच्यापासून वंचित राहिला होता. तो म्हणजे स्त्री वर्ग होय. ब्रिटिश सत्ता भारतात प्रस्थापित झाली त्याकाळात भारतातील स्त्रियांची स्थिती अतिशय वाईट होती. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. स्त्रियांनी शिक्षण घेणे म्हणजे महापाप समजले जात होते, त्यांनी फक्त चूल आणि मूल या दोन गोष्टी सांभाळाव्यात असे जनमत होते. तसेच त्यांना पुरुषांच्याबरोबरची, समानतेची वागणूक दिली जात नव्हती. त्यांना एखाद्या दासीप्रमाणे वागणूक दिली जात असे. घरातील पुरुष म्हणेल ती पूर्व दिशा अशी स्थिती होती. तसेच आणखीही काही अमानुष प्रथा त्यावेळी होत्या. उदा: १) बालविवाह : म्हणजे मुला - मुलींचे विवाह अगदी लहान वयातच लावले जात असत. त्यामुळे अगदी लहानपणापासून मुलींना सर्व कामे करावी लागत.बालपणीच त्यांच्यावर अनेक निर्बंध येत. २) जरठ-कुमारी विवाह: म्हणजे बारा-तेरा वर्षे वयाच्या मुलींचा विवाह साठी पंचाहत्तरी गाठलेल्या म्हाताऱ्याशी करून दिला जात असे. त्यामुळे मुलींचे आयुष्य उध्वस्त होत असे.३) हुंडा पद्धती: म्हणजे मुलीच्या लग्नावेळी मुलीच्या आई-वडिलांनी मुलांकडील लोकांना पैसे, सोने, वस्तू हुंडा म्हणून द्याव्या लागत. त्यामुळे लोकांना मुली असणे हे दु:खाचे वाटे. तिच्या जन्माचा आनंद होत नसे.४) सती प्रथा: पूर्वी सती प्रथा होती म्हणजे एखाद्या स्त्रीचा नवरा निधन पावल्यानंतर तिलाही तिच्या पतीच्या पेटत्या चितेत उडी घेऊन आपले जीवन संपवावे लागे. अतिशय अमानुष अशी ही प्रथा होती. ५) केशवपन : पतीच्या निधनानंतर स्त्रीचे केस काढून टाकण्याची पद्धत काही जातींमध्ये होती. त्यामुळे त्यांचा चेहरा विद्रुप दिसे. अशा अवस्थेत त्यांना संपूर्ण जीवन काढावे लागे. ६) विधवा विवाहास विरोध: मुलांनो आजच्या काळात एखाद्या स्त्रीचा नवरा निधन पावल्यास तिला पुनर्विवाह करण्याचा अधिकार कायद्याने दिला आहे. परंतु पूर्वी विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता नव्हती. यांसारख्या अतिशय अमानुष व स्त्रियांवर अन्याय, करणाऱ्या जुलमी प्रथा त्याकाळी भारतीय समाजात होत्या. त्या दूर करण्यासाठी त्याकाळातील समाज सुधारकांनी प्रयत्न केले.""