स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ

जहाल युग भाग २

views

3:28
जहाल युग भाग २ : टिळक मंडालेच्या तुरुंगात होते. त्यावेळी त्यांनी ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचा गाभाच कर्मयोग असून लोकांनीही कृतिशील राहावे यावर त्यांचा भर होता. म्हणजेच कोणत्याही दैवी शक्तीवर किंवा व्यक्तीवर अवलंबून न राहता आपण आपल्या तयारीत राहावे असे टिळकांचे मत होते.स्वभाषा, स्वसंस्कृतीविषयी प्रेम, आस्था बाळगणारी पिढी निर्माण व्हावी यासाठी जहाल नेत्यांनी शैक्षणिक संस्था स्थापन केल्या. या संस्थामधून स्वभाषेतून शिक्षण दिले जाऊ लागले. तसेच आपली संस्कृती कशी श्रेष्ठ आहे, याची शिकवण देऊन आपल्या संस्कृतीविषयी प्रेम, आपलेपणा, जिव्हाळा बाळगणारी पिढी निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले जाऊ लागले.लक्षावधी हिंदी जनतेने स्वातंत्र्य चळवळीच्या माध्यमातून एकत्र येऊन आपली सर्व शक्ती एकवटून इंग्रज राज्यकर्त्यांना वठणीवर आणावे, असे जहालांचे नेते बिपीनचंद्र पाल यांचे मत होते. आपल्या हक्कांसाठी आपण तीव्र आंदोलने केली पाहिजेत. आपल्या हक्कांसाठी ब्रिटिशांकडे आपण भीक मागता कामा नये असे जहाल नेत्यांचे मत होते. पण जहाल नेत्यांनी सशस्त्र बंडाची भूमिका घेतली नाही. त्याऐवजी त्यांनी संपूर्ण देशभरातून मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभारले पाहिजे असे मत प्रतिपादन केले. राष्ट्रीय सभेतील मावळ गटाने स्वातंत्र्य चळवळीचा पाया घातला तर जहाल गटाने ही चळवळ पुढे नेली.