स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ

बंगालची फाळणी

views

3:29
बंगालची फाळणी- आधुनिक हिंदुस्थानच्या इतिहासात ‘बंगालची फाळणी’ ही जहालवादास उधाण आणणारी एक महत्त्वपूर्ण घटना ठरली. बंगालची फाळणी हे लॉर्ड कर्झनचे दडपशाहीचे सर्वात मोठे वाईट कृत्य होते. हिंदू-मुस्लीम समाजात दुहीचे बीज पेरून ‘फोडा आणि राज्य’ करा या नीतीचा वापर करायचे ब्रिटिशांनी ठरविले. बंगालचा प्रांत हा मोठा प्रांत होता. या प्रांतात बिहार, ओरिसा, आसामचा काही भाग, छोटा नागपूर याही प्रदेशांचा समावेश असल्याने राज्यकारभाराच्या सोयीसाठी त्याची फाळणी करणे सरकारला आवश्यक वाटत होते. त्या दृष्टिकोनातून ती झाली असती तर हिंदी जनतेचा फारसा विरोध झाला नसता. परंतु ही फाळणी करीत असताना मुस्लीम संख्येने जास्त असलेला पूर्व बंगालचा प्रदेश बाजूला काढून मुस्लिमांना स्वातंत्र्य चळवळीपासून दूर करण्यासाठी फुटीरता वाद जोपासायचा हा लॉर्ड कर्झनचा विचार होता. म्हणून त्याने १९०५ मध्ये बंगाल प्रांताची फाळणी जाहीर केली. या फाळणीमुळे मुस्लीम बहुसंख्यांकांचा पूर्व बंगाल आणि हिंदु बहुसंख्यांकांचा पश्चिम बंगाल अशी रचना झाली. बंगालच्या फाळणीमुळे हिंदू-मुस्लिमांत फूट पाडून स्वतंत्रता चळवळ दुबळी करणे हा इंग्रजांचा छुपा हेतू होता.