वजाबाकी

हातच्याची वजाबाकी

views

4:35
हातच्याची वजाबाकी : मुलांनो, आता आपण हातच्याच्या वजाबाकीची उदाहरणे कशी सोडवावी ते काही उदाहरणातून शिकू. उदाहरण १: ९०७२ – ७५४८ = ? मुलांनो, प्रथम आपण हे उदाहरण उभ्या मांडणीत लिहू. प्रथम एककापासून सुरवात करायची आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे. पहा, एककात आपल्याला २ मधून ८ एकक वजा करायचे आहेत: ते वजा करता येतील का? वि: नाही सर. शि: मग काय करावे लागेल? वि: बाई एक दशक मोकळा करून तो एककात घ्यावा लागेल. शि: बरोबर! एक दशक म्हणजे १० एकक. ते आपण एककाच्या घरात डोक्यावर लिहिले. आता ७ दशकातील एक दशक दिल्यामुळे ६ दशक शिल्लक राहिले. आता पुढे काय करणार? वि: १२ तून ८ गेले तर एककात ४ बाकी राहिले. ६ दशकातून ४ दशक वजा करावे लागतील. मग दशकात २ शिल्लक राहतील. शि: बरोबर! आता शतकात पहा. इथे तर शून्यच आहे. आणि आपल्याला शून्यातून ५ शतक वजा करायचे आहेत. हे होणार नाहीत. म्हणून आपण हजाराच्या घरातून १ हजार सुट्टा केला आणि तो शतकात घेतला. म्हणून आता शतकात १० शतक झाले. आणि १० शतकांतून ५ शतक वजा केले, राहिले ५. आता हजाराच्या घरात ९ मधून १ हजार दिल्याने ८ हजार राहिले आहेत. आणि या ८ हजारांतून ७ हजार वजा केले तर राहिले १ हजार. म्हणून ९०७२ – ७५४८ = १५२४ शिल्लक राहिले.