वजाबाकी Go Back पाच अंकी संख्यांची बिनहातच्याची वजाबाकी views 3:00 पाच अंकी संख्यांची बिनहातच्याची वजाबाकी : मुलांनो, आता आपण पाच अंकी संख्यांची बिनहातच्याची वजाबाकी काही उदाहरणातून समजून घेऊ. उदाहरण १) एका गावात जलसंधारणासाठी ८६,५७४ रुपये लोकवर्गणी जमा करण्यात आली. त्यातून ७४२५४ रुपये खर्च झाली. उरलेली रक्कम जलपुनर्भरणासाठी वापरण्याचे ठरले. तर जलपुनर्भरणासाठी किती रक्कम मिळाली? या उदाहरणात लोकवर्गणीच्या रक्कमेतून जलपुनर्भरणासाठी खर्च झालेली रक्कम वजा करावी लागेल. त्यासाठी योग्य पद्धतीने स्थानानुसार अंकांची मांडणी एका खालोखाल एक करून घेऊ. आता ४ मधून ४ वजा केले असता शून्य उरतात. ७ मधून ५ वजा केले असता २ उरतात. ५ मधून २ वजा करू. ३ उरतील. ६ मधून ४ वजा करू २ उरतील. आणि ८ मधून ७ वजा करू १ उरेल. म्हणून १२३२० रक्कम जलपुनर्भरणासाठी वापरण्यात येईल. उजळणी चार अंकी संख्यांची बिनहातच्याची वजाबाकी हातच्याची वजाबाकी पाच अंकी संख्यांची बिनहातच्याची वजाबाकी पाच अंकी संख्यांची हातच्याची वजाबाकी तोंडी बेरीज वजाबाकी