उत्क्रांती Go Back पृष्ठवंशीय प्राण्यांचे प्रकार views 4:25 पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये विविध प्रकारचे प्राणी आहेत. जलचर, उभयचर, पक्षीवर्ग, सरपटणारे, सस्तन असे प्रकार पडतात. जलचर प्राणी : जे प्राणी पाण्यात राहतात त्यांना जलचर प्राणी म्हणतात. उभयचर प्राणी: बेडूक तर तुम्ही सर्वांनी पाहिलाच असेल. तो आपल्याला कधी पाण्यात दिसतो तर कधी जमिनीवर. म्हणूनच त्याला उभयचर प्राणी म्हणतात. म्हणजेच जे प्राणी पाण्यामध्ये तसेच जमिनीवर अशा दोन्ही ठिकाणी राहतात, त्यांना उभयचर प्राणी असे म्हणतात. पक्षीवर्ग :हे जीव प्रामुख्याने त्यांच्या उडण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहेत. पण शहामृगासारखे न उडणारे पक्षीही असतात. पक्षी हे त्यांच्या त्वचेवरून ओळखले जातात. त्यांची त्वचा पिसांनी झाकलेली असते. हे जमिनीवरचे जीव आहेत आणि ते हवेतील प्राणवायूवर जगतात. ते अंडी घालतात आणि अंड्यांमधून नवे जीव जन्माला येतात. सरपटणारे प्राणी: साप हा प्राणी पोटाने सरपटत चालतो म्हणून त्याला सरपटणारा प्राणी म्हणतात. त्याला पाय नसल्यामुळेच तो सरपटत चालतो. हे प्राणी जमिनीवर अथवा पाण्यामध्ये राहतात. यांना पाण्याच्या आत श्वसन करता येत नाही. श्वसनासाठी त्यांना पाण्यावरच यावे लागते. तसेच यातील काही प्राणी पूर्णतः जमीनीवर देखील रहातात. यांची त्वचा ही खवल्यांची बनलेली असते. सापही अंडी घालतात. सापाप्रमाणेच सुसरी, कासव हे प्राणीही अंडी घालतात. सस्तन प्राणी: जे प्राणी पोटात पिल्लाची वाढ पूर्ण झाल्यानंतर पिल्लांना जन्म देतात, आणि जन्मानंतर आईच्या दुधावर त्यांचे पोषण होते अशा प्राण्यांना सस्तन प्राणी म्हणतात. म्हणूनच पिलाला जन्म देणे आणि जन्मानंतर त्यांचे स्वत:च्या दुधावर पोषण करणे ही सस्तन प्राण्यांची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये सर्वात अधिक उत्क्रांत झालेला टप्पा म्हणजे सस्तन प्राणी समजला जातो. बऱ्याच गोष्टींना जसा अपवाद असतो तसेच या सस्तन प्राण्यांमध्येही बदकचोच्या आणि मुंगीखाऊ हे प्राणी असे अपवाद आहेत. ते पिलांना जन्म देत नाहीत तर अंडी घालतात. तर पृष्ठवंशीय प्राण्यांचे असे हे पाच प्रकार आहेत. उत्क्रांतीची संकल्पना उत्क्रांतीची गोष्ट प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे पृष्ठवंशीय प्राण्यांचे प्रकार