माझी आनंददायी शाळा

प्रस्तावना सांगा पाहू

views

4:23
आपण आपल्या आई – वडिलांना सोडून तीन ते चार तास राहू लागतो, ते शाळेत जाऊ लागल्यावर. आपण पहिल्यांदा शाळेत जातो, तेव्हा आपल्याला रडायला येते, शाळाला नकोशी वाटते. परंतु, जसजसे आपण शाळेत रोजच्या रोज जाऊ लागतो, तेव्हा आपल्याला आपली शाळा आवडू लागते. मग मात्र आपण एकही दिवस न घरी राहता शाळेत जाऊ लागतो. आपल्याला आपली शाळा आनंददायी वाटू लागते. शाळा अशी आनंददायी वाटण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. त्यांचीच माहिती आपण या पाठात घेणार आहोत. आपण शाळेत प्रामुख्याने शिक्षण घेण्यासाठी जातो. परंतु, त्याचबरोबर शाळेतून आपण इतरही अनेक गोष्टी शिकत असतो. अनेक गोष्टींची मजा घेत असतो. तसेच शिकता शिकता खूप मित्रमैत्रिणी बनवीत असतो. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपण करीत असतो. मित्रमैत्रिणींबरोबर अनेक प्रकारचे खेळही खेळतो. सर्वजण मिळून एकत्र डबा खातो, शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सहभागी होतो. शाळेच्या सहलींना आपण सर्व मित्र व शिक्षक मिळून जातो. तेथे आपण सहलीचा व विविध गोष्टींचा मनमुराद आनंद घेतो. तसेच आपण नियमित आपले वर्ग स्वच्छ ठेवतो व ते आपण आवडीने सजवतोही. मुलांनो आपण आपल्या अशा किती तरी गोष्टी सर्वजण एकत्र येऊन करत असतो. आपण हे सारे मिळून करत असतो म्हणूनच या गोष्टी करताना आपल्याला वेगळीच मजा येते. परंतु, तुम्हांला शाळेत किंवा शाळेतील शिक्षणात किंवा इतर गोष्टीत जशी मजा येते, तशी तुमच्या वर्गातील प्रत्येक मुलामुलीला मजा येतेच असे नाही. काही मुले मुली शाळेत नाखूष असतात. त्यांना शाळा नकोशी वाटते. ते शाळेत आनंदी राहत नाहीत. मग अशा मुलामुलींसाठी काय बरे करता येईल? तर अशा मुलांसाठी शिक्षकांना विविध प्रकारचे प्रयोग करावे लागतील.