गुणाकार: भाग २

दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणणे

views

4:14
आता आपण दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने कसे गुणतात ते चौकटीपद्धत व उभ्या मांडणीने समजून घेऊ. प्रथम आपण चौकटी पद्धतीने गुणाकार करून पाहू. ३८ x २४ सर्वप्रथम या दोन्ही संख्यांचा विस्तार करून घेऊया. ३८ = ३० + ८ व २४ = २० + ४. प्रथम २० ने ३० ला गुणू. ६०० उत्तर आले. नंतर २० ने ८ ला गुणू. १६० उत्तर आले. आता ४ ने ३० ला गुणू. १२० उत्तर आले. शेवटी ४ ने ८ ला गुणू ३२ उत्तर आले. आता ६०० + १६० + १२० + ३२ या सर्वांची बेरीज करू. या सर्वांची बेरीज झाली ९१२. म्हणून ३८ x २४ यांचा गुणाकार ९१२ येईल.