भागाकार: भाग 2

प्रस्तावना

views

3:34
भागाकार ही क्रिया कशी करायची ते आपण पाहिलं आहे. दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने कशाप्रकारे भागायचे त्याच्या विविध उदाहरणांचा सराव आपण केला आहे. भागाकारातील घटक भाज्य, भाजक, भागाकार, आणि बाकी यांचा सुद्धा अभ्यास केला आहे. संख्या दिली असता आपण भागाकार क्रिया सहजपणे करत होतो. परंतु आता आपल्याला शाब्दिक उदाहरणावरून भागाकार ही क्रिया करायची आहे. मुलांनो लक्षात ठेवा की जेव्हा अनेकांवरून एकाची किंमत काढायची असते तेव्हा आपण भागाकार क्रिया करतो.