भागाकार: भाग 2

सरावासाठी उदाहरणे:

views

3:18
सरावासाठी उदाहरणे: उदा.१) ६२९ ÷ ३ हा भागाकार करा. या उदाहरणात क्रमाने शतक, दशक, एकक यांना ३ ने भागायचे. ३ दुणे ६,म्हणून ६ ला ३ ने भाग जातो. भागाकारात शतकस्थानी २ लिहिले. आता २ दशक खाली घेऊन भागाकार करू. २ मधून ३ ची शून्य पटच वजा करता येते, म्हंणून भागाकारात दशकस्थानी 0 शून्य लिहू. २ – 0 = २, म्हणून २ दशक उरले. २ दशकाचे २० एकक व पहिले ९ अशा २९ एककांना ३ ने भागायचे. ३ नवे २७ म्हणून ९ चा भाग जातो. २९ – २७ = २. म्हणजे बाकी २ आणि भागाकार २०९ आहे.