राष्ट्ररक्षक मराठे

अफगाणांशी संघर्ष – पुढील भाग:

views

3:21
अफगाणांशी संघर्ष – पुढील भाग: मराठे व मुघल यांच्यात झालेल्या करारानुसार छत्रपती शाहू महाराजांच्या वतीने पेशवा नानासाहेब यांनी शिंदे-होळकरांच्या फौजा दिल्लीचे रक्षण करण्यासाठी पाठविल्या. मराठयांची त्याकाळी एवढी दहशत होती की मराठे दिल्लीला येत आहेत हे समजताच बादशाह अब्दाली आपल्या मायदेशी म्हणजेच अफगाणिस्तानला परत गेला. मराठे मजल-दरमजल करत म्हणजे वाटेत मुक्काम करत करत दिल्लीला येऊन पोहचले. मराठे दक्षिणेतून उत्तरेत आले होते. कारण मराठयांना आपल्या देशाचे रक्षण महत्त्वाचे वाटत होते. तसेच परकीयांनी आपल्या देशात येऊन आपल्यावर राज्य करावे हे मराठयांना मान्य नव्हते. असा मोठा व सर्वांच्या हिताचा दृष्टिकोन मनात ठेवून मराठे उत्तरेत आले होते. परंतु, मराठयांचा हा उदात्त हेतू उत्तरेतील इतर सत्ताधीशांच्या लक्षात आला नाही. यामुळे उत्तरेतील सत्ताधीश मराठयांना आपले स्पर्धक मानत होते. आपले वर्चस्व कमी होत आहे असे वाटून मराठयांना मदत न करता ते तटस्थ राहिले.