राष्ट्ररक्षक मराठे

पानिपतचा रणसंग्राम

views

3:18
पानिपतचा रणसंग्राम: पानिपतची तिसरी लढाई १४ जानेवारी १७६१ रोजी भारतातील हरियाणा राज्यातील पानिपत जवळ झाली. याच ठिकाणाजवळ पानिपतची पहिली दोन युद्धे झाली होती. महाराष्ट्रातील एक तरुण पिढी गारद झाली. पानिपतच्या या लढाईत अनेक पराक्रमी मराठी सरदार धारातीर्थी पडले. भाऊसाहेब, विश्वासराव, इब्राहीमखान, यशवंतराव पवार, तुकोजी शिंदे, जनकोजी शिंदे ही मात्तबर मंडळी मारली गेली. नानासाहेब पेशवे उत्तरेत निघाले असताना रस्त्यात त्यांना निरोप आला होता: ’दोन मोत्ये गळाली. सत्तावीस मोहोरा हरवल्या! आणि रुपये खुर्दा किती गेल्या यांची गणतीच नाही”. दोन मोत्ये म्हणजेच विश्वासराव व भाऊसाहेब. उत्तरेतील सत्ताधीश मराठयांना मदत करण्याऐवजी तटस्थ राहिले. त्यामुळे भारताच्या रक्षणाची जबाबदारी एकट्या मराठयांवर पडली. भारत हा एक देश आहे. त्याचा राजा कोणत्याही धर्माचा असला तरी त्याला पाठिंबा देणे आपले कर्तव्य आहे ही जाणीव इतिहासात पहिल्यांदा मराठयांनी दाखविली असे म्हणता येईल.