राष्ट्ररक्षक मराठे

पेशवा माधवराव

views

4:31
पेशवा माधवराव: आपला भाऊ, मुलगा व नातेवाईकांच्या मृत्यूचा नानासाहेबांना मोठा धक्का बसला. त्यांची मन:शांती नष्ट झाली. दिवसेंदिवस नानासाहेबांची तब्येत खालावत गेली. त्यातच २३ जून १७६१ रोजी त्यांचा मृत्यू झाला. विश्वासराव, माधवराव व नारायणराव. परंपरेनुसार नानासाहेबांनंतर पेशवेपदावर त्यांचा मोठा मुलगा विश्वासरावाचा अधिकार होता. परंतु, नियतीला ते मान्य नव्हते. पानिपतच्या युद्धात लढता लढता विश्वासराव मारला गेला होता. त्यामुळे माधवराव हा पेशवेपदी आला. पानिपतच्या लढाईत मराठयांचा पराभव झालेला पाहून निजामाने मराठयांविरुद्ध पुन्हा हालचाली सुरु केल्या. त्याने मराठी प्रदेशांवर आक्रमण केले. परंतु, पेशवा माधवरावाने पैठण जवळील राक्षसभुवन येथे त्याचा पराभव केला. पानिपतच्या पराभवामुळे पुढे काही काळ त्यांना कर्नाटकाकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नाही. याचा फायदा घेऊन महत्त्वाकांक्षी व धाडसी हैदरअलीने आपली सत्ता म्हैसूरमध्ये स्थापन केली. हैदरअली हा म्हैसूरचा सुलतान बनला. पेशवा माधवरावांनंतर गादीवर आलेले त्यांचे बंधू नारायणराव व नारायणरावांचे पुत्र सवाई माधवराव हया दोन्ही पेशाव्याना अल्पायुष्य मिळाले. म्हणजे कमी वयातच त्यांचे निधन झाले.