राष्ट्ररक्षक मराठे

मराठी सत्तेच्या वर्चस्वाची पुन:स्थापना

views

2:33
मराठी सत्तेच्या वर्चस्वाची पुन:स्थापना:- मुलांनो, या पाठात आपण पाहिले की, मराठयांचा एवढा मोठा पराभव झाला की, मराठी सत्ता याच्यातून आता पुन्हा उभी राहू शकत नाही असेच सर्वांना वाटले होते. तसेच पानिपतच्या युद्धातील पराभवामुळे उत्तर भारतातील मराठयांच्या प्रतिष्ठेला जबर धक्का बसला होता. उत्तरेत परत प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी पेशवा माधवरावाने महादजी शिंदे, तुकोजी होळकर, रामचंद्र कानडे व विसाजीपंत बिनीवाले या आपल्या कर्तबगार सरदारांना उत्तरेत पाठविले. पानिपत सारखा मोठा पराभव पचवून उत्तरेच्या राजकरणात मराठे यशस्वी झाले ही महत्त्वाची बाब आहे. यामध्ये मल्हारराव होळकर आणि महादजी शिंदे यांनी महत्त्वाचा वाटा उचलला. त्यांच्या पराक्रमामुळे अशक्य अशी गोष्ट शक्य झाली.