समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण

भागीदारी उदाहरणे

views

2:38
भागीदारी उदाहरणे :- अब्दुल, सेजल व सोहम यांनी सायलीला अनुक्रमे 30 रुपये, 70 रुपये आणि 50 रुपये दिले. सायलीने त्यात 150 रुपये घालून कागद, रंग या वस्तू आणल्या. त्यापासून सर्वांनी भेटकार्डे बनवली व ती सर्व भेटकार्डे विकली. त्यांना एकूण 420 रुपये नफा मिळाला. तर प्रत्येकाला किती नफा मिळाला? उत्तर: पाहा, इथे चौघांचे एकूण भांडवल 300 रुपये होते. त्यांपैकी सायलीचे 150रुपये होते, म्हणजे निम्मे भांडवल तिचे होते. त्यांना एकूण 420 रुपये नफा मिळाला. सायलीचा नफा 420 ची निमपट म्हणजे 210 रुपये झाला. उरलेला 210 रुपये नफा अब्दुल, सेजल व सोहम यांना वाटायचा आहे. अब्दुल, सेजल व सोहम यांची भांडवले अनुक्रमे 30रुपये, 70 रुपये आणि 50 रुपये आहे. म्हणून भांडवलाचे प्रमाण 30 : 70 : 50 आहे. म्हणजेच 3:7:5 आहे. तिघांचा नफा 210 रुपये आहे. त्यांचा नफा अनुक्रमे 3k + 7k + 5k मानू. म्हणून 3k + 7k + 5k = 210 तिघांची बेरीज करू. 15k = 210 म्हणून k = 210/15 k = 14 आपल्याला k ची किंमत मिळाली आहे. म्हणून आता आपण अब्दुल, सेजल आणि सोहम यांचा नफा काढूया. अब्दुलचा नफा = 3k आहे. म्हणून 3 x 14 = 42 रुपये आहे. (इथे k ची किंमत घातली). सेजलचा नफा = 7k आहे. म्हणून 7 x 14 = 98 रुपये आहे. आणि सोहमचा नफा = 5k आहे. म्हणून 5 x 14 = 70 रुपये आहे. म्हणून अब्दुलचा 42 रुपये, सेजालचा 98 रुपये आणि सोहमला 70 रुपये नफा झाला आहे.