त्रिकोण

उदाहरण3

views

5:15
आता आपण एक सोडवलेले उदाहरण पाहूया. उदा.3) सिद्ध करा की, त्रिकोणाच्या बाजू एकाच दिशेने वाढवल्यास होणाऱ्या बाहयकोनांची बेरीज 360० असते. पक्ष: PAB, QBC आणि ACR हे ABC चे बाहयकोन आहेत. साध्य: PAB + QBC + ACR = 360० असते. सिदधता: या उदाहरणाची सिद्धता दोन रीतीने देता येते. रीत – 1: ABC मध्ये जर PAB हा बाहयकोन विचारात घेतला तर ABC व ACB हे त्याचे दूरस्थ आंतरकोन आहेत, ∴ BAP = ABC + ACB -----------विधान(1) तसेच ACR = ABC + BAC ---------------विधान(2) दूरस्थ आंतरकोनाच्या प्रमेयानूसार आणि CBQ = BAC + ACB ---------------- विधान (3) आता विधान 1, 2 व 3 यांच्या दोन्ही बाजूंची बेरीज करूया. = BAP + ACR + CBQ = ABC + ACB + ABC + BAC + BAC + ACB = 2 ABC + 2 ACB + 2 BAC = 2 ( ABC + ACB + BAC) = 2 x 180० = 360० ---------- (त्रिकोणाच्या आंतरकोनाची बेरीज) ∴ PAB + QBC + ACR = 360० आहे.