त्रिकोण

त्रिकोणाची मध्यगा

views

4:04
आज आपण त्रिकोणाची मध्यगा समजून घेवूया. त्रिकोणाचा शिरोबिंदू व त्याच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे त्या त्रिकोणाची मध्यगा होय. या आकृतीत D हा बाजू BC चा मध्यबिंदू आहे. म्हणून रेख AD ही ABC ची मध्यगा आहे. मध्यगा संपांत बिंदू (कृती1) : ABC मध्ये रेख AD रेख CF व रेख BE या मध्यगा आहेत. या मध्यगा परस्परांना G या बिंदूत छेदतात. G या बिंदूला मध्यगा संपांत बिंदू म्हणतात. पहा AG ची लांबी GD च्या दुप्पट आहे. BG ची लांबी GE च्या दुप्पट आहे आणि CG ची लांबी GF च्या दुप्पट आहे. यावरून असे कळते की, मध्यगा संपात बिंदू प्रत्येक मध्यगेचे 2 : 1 या प्रमाणात विभाजन करतो. कृती2: ABC हा एक त्रिकोण पुठ्ठ्यावर काढा व कापा. त्याच्या तिन्ही मध्यगा काढा. त्यांच्या संपातबिंदूला G हे नाव द्या. तळाचा पृष्ठभाग सपाट असणारी पेन्सिल घ्या व सपाट भाग वर करून ती पेन्सिल उभी धरा. पहा पेन्सिलवर बिंदू G ठेवून त्रिकोण तोलून धरता येतो.