त्रिकोण

त्रिकोणांची एकरूपता

views

4:32
आता आपण त्रिकोणांची एकरूपता जाणून घेवूया. एक रेषाखंड दुसऱ्यावर ठेवल्यास तंतोतंत जुळला तर ते दोन रेषाखंड एकरूप असतात. तसेच एक कोन उचलून दुसऱ्या कोनावर ठेवल्यास तो तंतोतंत जुळतो तेव्हा ते दोन कोन एकरूप असतात. त्याचप्रमाणे एक त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणावर ठेवल्यास तो तंतोतंत जुळला तर ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असे म्हणतात. समजा ABC आणि PQR हे एकरूप असतील तर ते ABC ≅ PQR असे दाखवतात.