कार्य आणि ऊर्जा

शक्तीवर आधारित काही उदाहरणांचा अभ्यास करूयात

views

2:43
शक्तीवर आधारित काही उदाहरणांचा अभ्यास करूयात. उदाहरणार्थ स्वरालीस 20 किलो वजनाची बॅग 5 मीटर उंचीवर नेण्यास 40 सेकंद लागतात तर तिची शक्ती किती आहे? उत्तर: सर्व प्रथम आपण या उदाहरणात दिलेल्या किमती लिहूया, वस्तुमान m = 20 kg, उंची h = 5 m, वेळ t = 40 s आहे. म्हणून, स्वरालीस लावावे लागलेले एकूण बल काढूया, बल = वस्तुमान x गुरुत्वीय बल (F = mg ) = 20 X 9.8 म्हणून बल F = 196 N न्यूटन आहे. आता आपण स्वरालीने 5 m उंचीवर बॅग उचलताना झालेले कार्य काढूयात, कार्य = बल x विस्थापन (W = F s ) = 196 X 5 = 980 J ज्यूल म्हणून, शक्ती = (कार्य )/(वेळ) ( P= w/t ) = 980/40 आता 980 ला 40 ने भागूया, म्हणून, स्वरालीची शक्ती P = 24.5 W वॅट इतकी आहे.